Saturday, November 21, 2015

सोलापूर जिल्ह्यातील सेतु सुविधा केंद्रात विविध पदांच्या 43 जागा

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा सेतु सोसायटीमार्फत चालविण्यात येणाऱ्या सेतु सुविधा केंद्रात संगणक तांत्रिक अभियंता (1 पद), डाटा एन्ट्री ऑपरेटर (उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर) (२४ पदे), डाटा एन्ट्री ऑपरेटर (अक्कलकोट, माढा, करमाळा, मोहोळ, सांगोला, माळशिरस) (१८ पदे) कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नाव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती www.solapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.[सौजन्य - महान्यूज ]
जहिरातीसाठी येथे Click करा. 

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात विविध पदांच्या 4 जागा

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात प्रोफेसर (पीएसआर) (1 पद), असोसिएट प्रोफेसर (पीएमआर) (1 पद), असिस्टंट प्रोफेसर (पीएमआर) (2 पदे) एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येत आहेत. दि. 1 डिसेंबर 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहिती www.aiipmr.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
जहिरातीसाठी येथे Click करा.

बेस्ट उपक्रमामध्ये उप मुख्य लेखा अधिकारी (वरिष्ठ) पदाची जागा

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमम लेखा विभागामध्ये उप मुख्य लेखा अधिकारी (वरिष्ठ) (अनुसुचित जातीकरिता राखीव) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती www.bestundertaking.com या संकेतस्थळावर उपलबद्ध आहे.  
जहिरातीसाठी येथे Click करा.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध शिक्षकी पदांची भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध शिक्षकी पदे भरण्याकरिता दि. 9 ते 29 नोव्हेंबर 2015 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. For detailed information visit to admin.unipune.ac.in/recruitment 

भंडारा येथे 6 जानेवारीला सैन्‍य भर्ती

भंडारा येथे आर्मीची दिनांक 6 जानेवारी 2016 रोजी सैन्‍य भरती आयोजित केली आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.[सौजन्य - महान्यूज ]

मराठा लाईट रेजिंमेन्‍ट सेन्‍टरमध्‍ये सैन्‍य भरती

मराठा लाईट रेजिमेन्‍ट येथे युनिट हेडक्‍वॉर्टर्स कोटा साठीची भर्ती दिनांक 30 नोंव्‍हेबर ते 3 डिसेंबर 2015 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.[सौजन्य - महान्यूज ]

भारतीय प्रौद्योगिक संस्थान मुंबई येथे मुख्य सल्लागार (सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर) पदाची जागा

भारतीय प्रौद्योगिक संस्थान मुंबई येथे मुख्य सल्लागार (सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर) (1 जागा), असिस्टंट रजिस्ट्रार (3 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती www.iitb.ac.in/jobs.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1. मुख्य सल्लागार (सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर) जहिरातीसाठी येथे Click करा.
2. असिस्टंट रजिस्ट्रार जहिरातीसाठी येथे Click करा.